Google Gemini कसे वापरावे?
सध्या Google Gemini ने AI जगात धुमाकूळ घातला आहे. तुम्ही त्याचा वापर कसा कराल? हे जाणून घेण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट ही आहे की, हे ChatGPT ला टक्कर देणारे असल्याचे म्हटले जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामागे NVIDIA चा GPU (Graphic Processing Unit) नव्हे तर Google ने आपल्या TPU (Tensor Processing Unit) चा वापर केला आहे. Gemini च्या येण्याने ChatGPT व NVIDIA या दोघांच्याही एकाधिकारशाहीला आव्हान मिळाले आहे.
मी Google Gemini चा वापर सलग आठवडाभर केला. त्यानंतर मी त्याचा अनुभव तुम्हाला सांगत आहे.
मी Google Gemini च्या फ्री व्हर्जनचा वापर केला. तुम्ही ते Apple App Store किंवा Google Play Store वरून डाऊनलोड करू शकता. तुम्ही Jio चे यूझर असाल तर तुम्हाला प्रीमियम व्हर्जन 18 महिन्यांसाठी फ्री मध्ये मिळेल. जसे की Airtel यूझर्सला Perplexity व ChatGPT प्रत्येकाला फ्रीमध्ये मिळत आहे.
तर Gemini चा वापर तुम्ही 3 प्रकारे करू शकता.
सुरुवातीला Vibe Coding अर्थात तुम्हाला App किंवा वेबसाइट तयार करण्यासाठी कोडिंग जाणून घेणे गरजेचे नाही. तुम्हाला माहिती असेल की, कम्प्यूटर च्या भाषेला कोडिंग म्हणतात, जसे HTML, याच भाषेचा वापर करून इंजीनिअर सॉफ्टवेअर तयार करतात. आता तुम्हाला फक्त तुम्हाला कोणते उत्पादन तयार करायचे आहे ते लिहायचे आहे, जसे मी लिहिले होते, "SIP Calculator" तयार करा. तुम्ही निकाल देखील पाहू शकता.
http://rose-kimberley-60.tiiny.site/
करोडपती (किंवा लखपती) बनण्यासाठी दरमहा किती पैशांची गुंतवणूक करावी लागेल? तुम्ही ठरवा की, तुम्हाला किती वर्षांत कोट्यधीश बनायचे आहे व म्युचूअल फंड, सोने व पीपीएफ आदींमध्ये किती पैसे लावावे लागतील.
Gemini ला मी हा Prompt दिला
Build a web app with 4 inputs Target corpus / number of years to reach/ Monthly investment/ Mode of investment ( SIP in equity MF, Gold, Savings bank , PPF or any other mode you think used in India) before you execute this let’s fine tune the inputs
प्रत्युत्तरादाखल त्याने Prompt बरोबर केले व HTML कोड लिहून पाठवला. मी हा कोड लॅपटॉप च्या नोटपॅडवर sipplanner.html
नावाने सेव्ह केला व ती वेबसाइट माझ्या ब्राउझरमध्ये ओपन झाली. मला त्याची URL Tinny.host वर सापडली जी मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छित होतो, तिथे फाइल पेस्ट केली आणि वेबसाइट काम करू लागली.
मी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे ग्राफिक्स तयार करणे. Gemini मध्ये ग्राफिक्स किंवा फोटो तयार करण्यासाठी Nano Banana मॉडेल आहे. तुम्हाला हवे ते तुम्ही तयार करू शकता. मी त्याला Gemini कसे काम करते ते समजावून सांगण्यास सांगितले. त्याने हे ग्राफिक्स तयार केले. त्यात हिंदीत काही चुका झाल्या असल्या तरी इंग्रजी ठीक आहे.
हे ग्राफिक्स Gemini 3 च्या मदतीने बनवले आहे.
तिसरे काम म्हणजे तुमचा ट्रॅव्हल एजंट. तुम्ही तुमचे बजेट आणि तारखा द्या. एआय तुमचे गुगल कॅलेंडर स्वतः जाऊन तपासेल की तुम्ही त्या तारखेला फ्री आहात की नाही. त्यानंतर ते तुम्हाला एअरलाइन किंवा हॉटेलच्या बुकिंगपर्यंत घेऊन जाईल. तुमचे नाव आणि फोन नंबर यासारखी आवश्यक माहिती भरेल. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला फक्त ओके वर क्लिक करावे लागेल. पुढे जाऊन हे कामही जेमिनी स्वतःच करेल.
तर आता तुम्ही कशाची वाट पाहता, तुम्हीही त्याचा आस्वाद घ्या आणि तुम्ही काय बनवले आहे ते आम्हाला सांगा?
Comments
Post a Comment