Google Gemini कसे वापरावे?
सध्या Google Gemini ने AI जगात धुमाकूळ घातला आहे. तुम्ही त्याचा वापर कसा कराल? हे जाणून घेण्यापूर्वी दोन गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट ही आहे की, हे ChatGPT ला टक्कर देणारे असल्याचे म्हटले जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामागे NVIDIA चा GPU (Graphic Processing Unit) नव्हे तर Google ने आपल्या TPU (Tensor Processing Unit) चा वापर केला आहे. Gemini च्या येण्याने ChatGPT व NVIDIA या दोघांच्याही एकाधिकारशाहीला आव्हान मिळाले आहे. मी Google Gemini चा वापर सलग आठवडाभर केला. त्यानंतर मी त्याचा अनुभव तुम्हाला सांगत आहे.