SSD म्हणजे काय? HDD चांगली की SSD?
नवीन पीसी, लॅपटॉप किंवा स्टोरेज डिव्हाइस घेताना आपल्यापुढे Hard Disk Drive (HDD) व Solid State Drive (SSD) चा पर्याय उपलब्ध असतो. त्यात अनेक लोक SSD चा विचार करत नाहीत. यामुळेच आपण या ब्लॉगद्वारे SSD म्हणजे काय? व त्याचे फायदे व तोटे काय हे जाणून घेऊया...
HDD व SSD या दोन्ही गोष्टी ऑपरेटिंग सिस्टम, अॅप्लिकेशन तथा आपला डेटा स्टोरेज करण्यासाठी वापरल्या जातात. पण SSD मध्ये हार्ड डिस्क प्रमाणे फिरते भाग नसतात तर त्यामध्ये फ्लॅश मेमरीचा वापर करण्यात आला असतो.
हार्ड डिस्कमध्ये चक्राकार भाग फिरत असतात. त्यांचा येणारा आवाजही तुम्ही ऐकला असेल. याऊलट SSD मध्ये मात्र सर्व उपकरणे बोर्डवर बसवलेले असतात. हे तुम्ही खालच्या इमेजमध्ये पाहू शकता.
SSD चा वापर का करावा? त्याचे फायदे काय?
SSD वापरण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यामुळे मिळणारा वेग. SSD ही HDD पेक्षा जास्त वेगाने काम करते. त्यामुळेच त्याचा वापर पीसी किंवा लॅपटॉप लवकर चालू करण्यासाठी केला जातो. या कामासाठी HDD वर एखादा मिनीट जातो. याऊलट SSD अगदी काही सेकंदात हे काम करते. एवढेच नव्हे तर आपण इंस्टॉल केलेले अॅप्लिकेशन किंवा गेम्स तत्काळ चालू करण्यासाठी व त्यांचा परफॉर्मेंस सुधारण्यासाठीही SSD चा वापर केला जातो. SSD मध्ये फॉटोशॉप, ऑफिस, मोठे अॅप्स किंवा गेम्स हे HDD च्या तुलनेत खूपच लवकर चालू होतात. तसेच आपल्या लॅपटॉप, पीसी किंवा मोबाइलचा वेग वाढवण्यासही त्याचा वापर होतो.
HDD सारखा SSD मध्ये डिस्क व फिरणारा पार्ट नसतो. त्यामुळे HDD चालू असताना प्रवास करताना धक्का बसल्यास HDD डॅमेज होऊ शकते. पण या स्थितीत SSD फायद्याची ठरते. त्यामुळे प्रवासात वापरण्यासाठी SSD सुरक्षित असते. याशिवाय SSD ही HDD सारखा थोडाही आवाज करत नाही. HDD च्या तुलनेत SSD कमी ऊर्जा वापरते. त्यामुळे लॅपटॉपमध्ये बॅटरीचा कमी वापर होतो. SSD ही HDD पेक्षा लहान व वजनाने हलकी असते. त्यामुळे त्याला फिट करण्यासाठी जागाही खूप कमी लागते.
आता तर आणखी लहान आकाराच्या NVMe M.2 SSD बाजारात आल्या आहेत. त्या नव्या लॅपटॉप, पीसी व मोबाइलच्या मदरबोर्डवरच लावता येतात.
तुमच्या सध्याच्या लॅपटॉपमध्ये Caddy चा वापर करून ती DVD-ROM च्या जागी बसवू ही शकता. यामुळे कामगिरी व वेग सुधारेल. ही कॅडी 200-300 रुपयांत मिळते. DVD ड्राइव्ह काढून तिथे तुमची HDD लावून HDD च्या जागी SSD लावू शकता. यामुळे अगदी जुने लॅपटॉपही चांगली कामगिरी करू शकतात. ऑपरेटिंग सिस्टिम SSD वर व बाकी सर्व डेटा HDD वर ठेवायचा
SSD चे काही तोटे
SSD ही HDD पेक्षा काही पटींनी महाग असते. उदाहरणार्थ 120GB SSD अंदाजे ₹2500-3000 पर्यंत जाते. तर 1TB HDD ₹3500-4000 पर्यंत.
HDD च्या तुलनेत SSD चे आयुर्मान कमी असते. कारण दरवेळेस नवीन माहिती भरताना आधीची पुसून टाकावी लागते. या प्रक्रियेत काही सेल्स डॅमेज होऊ शकतात (याचा अर्थ आपला डेटा जातो असा नव्हे तर आपला डेटा दुसर्या सेल्स मध्ये साठवला जातो) परंतु SSD आपल्या पीसी/लॅपटॉपच्या वापरापर्यंत तर सहजच टिकते.
आपल्याला आपल्या पीसी/लॅपटॉप वर स्वस्तात चांगली कामगिरी व वेग हवा आहे तर तुम्ही 120GB SSD घेऊन त्यावर ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल करू शकता आणि आपल्या फाइल/डेटा साठवण्यासाठी नेहमीची HDD वापरु शकता.
Comments
Post a Comment